World Cup 2019 Semi-Final IND vs NZ : पावसामुळे दिवसाचा खेळ रद्द, उद्या होणार उर्वरीत सामना
माय नगर वेब टीम
मँचेस्टर - भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी थांबवण्यात आला आहे. मँचेस्टरच्या मैदानात पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे पंच आणि सामनाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे. उर्वरित खेळ हा राखीव दिवशी म्हणजेच उद्या बुधवारी खेळवला जाईल. कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ४६.१ षटकानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. यानंतर सुमारे ४ तास पाऊस थांबेल याची वाट पाहिली गेली. पंच आणि सामनाधिकारी यांनी खेळपट्टीची पाहणीही केली, मात्र पाऊस थांबत नसल्यामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Post a Comment