लष्कराच्या युद्ध सरावानजीक गावाजवळ बॉम्ब स्फोट ; दोन ठार


माय नगर वेब टीम
अहमदनगर - एमआयडीसी हद्दीत असणाऱ्या लष्कराच्या के के रेंज भागामध्ये रात्रीच्या सुमारास जिवंत बॉम्बचा स्फोट झाला
यामध्ये खारे कर्जुने गावातील 2 जण मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान यापूर्वी ही असे प्रकार घडले असून अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे.

या घटनेमध्ये अक्षय नवनाथ गायकवाड (वय 19) आणि संदीप भाऊ साहेब तिरवडे (वय 32, राहणार खारे कर्जुने) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन जणांची नावे आहेत. माहिती अशी नगरच्या खारे कर्जुने गावाजवळ लष्कराचे ठाणे आहे. के के रेंज असे या लष्करी केंद्राचे नाव आहे. काल रात्रीच्या सुमाराला साधारण साडे अकराच्या वेळेला हे दोन जण बहुधा या ठिकाणी असलेले भंगार गोळा करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी असलेल्या वस्तूचा स्फोट झाला स्फोट एवढा भयानक होता की त्याचा आवाज आजूबाजूला आल्यानंतर तत्काळ लष्करातील अधिकारी तसेच नागरिक या ठिकाणी गोळा झाले. तेव्हा हे दोन जण या ठिकाणी पडलेले दिसून आले. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोरसे यांनी तत्काळ या दोन जणांना जिल्हा रुग्णालयामध्ये हलवले.

पोलीस कर्मचारी खताळ व त्यांच्या पथकाने त्यांना रात्रीच्या सुमाराला जिल्हा पुण्यात आले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
के के रेंज येथे लष्कराचा सराव मोठ्या प्रमाणात चालतो. आजूबाजूच्या गावाचे या ठिकाणी राहत असतात, या ठिकाणी स्फोट झाल्यानंतर तेथे पडणारे भंगार गोळा करण्यासाठी अनेक जण जात असतात. त्या सुमाराला हे दोघेजण त्याच पद्धतीने गेले असावे अशी माहिती पोलिसांच्या हाती आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे पोलीस निरीक्षक बोरसे यांनी सांगितले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post