‘अटींसह’ कॉंग्रेस आमदार नितेश राणेंना जामीन मंजूर





माय नगर वेब टीम
सिंधुदुर्ग – कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या १९ समर्थक आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी २० हजार रूपयांचा जामीन मंजूर करण्यात आला असून कणकवली पोलिस ठाण्यात दररविवारी हजेरी लावण्याची सक्ती केलीय. त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा करायचा नाही अशी सक्त ताकीत देऊन मुक्तता केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपअभियंत्याच्या अंगावर केलेली चिखलफेक राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या चांगलीच अंगाशी आली होती. कणकवली कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळल्याने नितेश राणेंसह इतर आरोपींना कोर्टाने ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

या प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना अटक करून त्यांच्या समर्थकांवर कलम ३५३, ३४२, ३३२, ३२४, ३२३, १२०(अ), १४७, १४३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. नितेश राणेंसह सर्व आरोपींना  कोर्टात हजर करण्यात ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज सर्वांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टात दोन्ही बाजूनी युक्तीवाद झाल्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post