खासदार म्हणाले, आ. संग्राम जगतापांचे स्वागत



माय नगर वेब टीम

अहमदनगर - एकमेकांविरोधात खासदारकीची निवडणूक लढविणारे डॉ. सुजय विखे आणि संग्राम जगताप दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. खासदार विखे यांचे भाषण सुरू असतानाच आमदार जगताप यांची एन्ट्री झाली अन् आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत असे म्हणताच राजकीय वर्तुळात तर्कविर्तकांना उधान आले.

केडगाव आणि नालेगावात महापालिकेच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका बांधण्यात येणार आहेत. 840 घरांसाठी साडेपाच हजार अर्ज आल्याने सोडत पध्दतीने लाभार्थी निवडण्यात आले. टिळक रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात हा आज सोडतीचा कार्यक्रम झाला. खासदार डॉ सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त प्रदीप पठारे, सभापती मुदस्सर शेख, सुरेश इथापे यांच्याससह नगरसेवक उपस्थित होते.

खा.विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील प्रत्येकाला घरकुल देण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पत भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे गृहनिर्माण खात्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य सरकारच्या गृहनिर्माण योजना सक्षमपणे राबवून अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गरीबाला घरकुल देणाचा प्रयत्न राहणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी घरकुल न मिळाल्यांनी नाराज न होता पुन्हा अर्ज करण्याचे आवाहन केले. तसेच कुठल्याही अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले.




महापालिका घरकुल योजनेच्या सोडत समारंभासाठी भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अमंत्रित करण्यात आले होते. एकमेकांविरोधात दोघांनी लोकसभा निवडणूक लढविली. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडल्यानंतर विखे व जगताप महापालिकेच्या कार्यक्रमात एकत्र येणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. कार्यक्रम सुरू झाला. विखे यांचे भाषण सुरू असतानाच आमदार संग्राम जगताप यांची कार्यक्रम स्थळी आगमन झाले. भाषण मध्येच थांबवित खासदार विखे यांनी, आमदार जगताप यांचे स्वागत’ असे म्हणत प्रोटोकॉल पाळला, मात्र त्यानंतर लगेचच राजकीय वर्तुळात तर्कविर्तकांना उधान आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post