माय नगर वेब टीम
अहमदनगर -
भारतीय सैन्यातील रामकिसन बहिरट यांची हवालदार पदावरुन नायब सुभेेदार पदी नियुक्ती झाली आहे. याबद्दल खडकी, बाबुर्डी बेंद ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
नगर तालुक्यातील खडकी येथील रामकिसन बहिरट यांना लहान पणापासूनच सैन्यात जाण्याची इच्छा होती. 19 वर्षापुर्वी ते सैन्यात भरती झाले. त्यांनी जम्मू कश्मीर, आसाम, सिक्कीम, मध्यप्रदेश येथे देशसेवा केली आहे. रामकिसन बहिरट यांची नुकतीचे नायब सुभेदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्याचे अधिकारी वर्ग, खडकी ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन होत आहे.

Post a Comment