माय नगर वेब टीम
नाशिक -
पैशांचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून दोघांनी माय-लेकीस गुंगीचे औषध पाजले. तसेच, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार गंगापूर येथील शिवाजीनगर परिसरातील जिजामाता कॉलनी परिसरात घडला.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार फेब्रुवारीत रात्रीच्या सुमारास दोन संशयित त्यांच्या घरी आले. तुमच्या घरात कोणी आजारी आहे का अशी विचारपूस करीत त्यांनी महिलेस गप्पांमध्ये गुंतवले. तसेच, महिलेला तुमच्या घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. त्यास भुलून तिने संमती दिली. त्यानंतर दोघा संशयितांनी महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीस गुंगीचे औषध मिसळवलेले पेय पिण्यास दिले. त्यामुळे माय-लेकी गुंगीत होते. पूजा करण्याच्या बहाण्याने दोघांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. घटना घडल्यानंतर दोघे संशयित पसार झाले. पीडितेचे पोट दुखत असल्याने वैद्यकीय चाचणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पीडितेच्या आईने दोघांविरोधात या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार संरक्षक (पोक्सो), बलात्कार, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार दोघांविरोधात गुन्हा केला आला आहे.
या प्रकरणी उपनिरीक्षक उज्ज्वला सातपुते या तपास करीत आहेत.
Post a Comment