हॅपी व्हॅली पुनर्जिवन मोहिमेतंर्गत वांबोरी घाटातील आनंददरीत वनौषधी झाडांची लागवड । दुष्काळात पशु-पक्ष्यांसाठी पाणीसेवा देणार्या दात्यांचा गौरव
माय नगर वेब टीम
अहमदनगर - भीषण दुष्काळी परिस्थितीत टँकर6द्वारे पशु, पक्षी व वन्यप्राण्यांना डोंगरगण (ता. नगर) वांबोरी घाट येथील हॅप्पी व्हॅलीत पाणीसेवा देऊन या व्हॅलीला निसर्गाचे पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी निसर्ग मित्र मंडळ व राजेंद्र गांधी मित्र मंडळाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या हॅप्पी व्हॅली पुनर्जिवन मोहिमेतंर्गत वनौषधी झाडांची लागवड करण्यात आली. वनौषधी वनस्पती लागवडीचा हा चौथा टप्पा होता.
श्रेया डहाळे हिच्या वाढदिवशी वनौषधी वनस्पती लागवडीस सुरूवात केली गेली. उजाड झालेल्या डोंगररांगा आणि निसर्गरम्य दरीला पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी झपाटलेल्या या मोहिमेतील निसर्गप्रेमींनी हातात रोप घेऊन डोंगरदर्यात वृक्षरोपण केले. १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनापासून ते जून अखेर दरीत पाणीसेवा देणार्या दात्यांचा ऋणनिर्देश पत्र देऊन गौरव करण्यात आले. यामधे इंजी.प्रशांत पाटील, मध्यानकाका, सुजाता पाअुलबुधे, कानिफनाथ तांबे, प्रविण अनभुले, कामगार संघटना महासंघ यांचा समावेश होता.
हॅप्पी व्हॅली पुनर्जिवन मोहिमेत सहभागी झालेल्या निसर्गप्रेमी सदस्यांनी शनिवार दि.६ जुलै रोजी सकाळपासूनच डोंगरगणस्थित हॅप्पी व्हॅलीत स्वच्छता अभियान राबविले. या दर्याखोर्यात असलेला मोठ्या प्रमाणातील प्लॅस्टिकचा कचरा गोळा करण्यात आला. दुपारी निसर्गाच्या सानिध्यात झालेल्या ऋणनिर्देश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य आदेश चंगेडिया तर प्रमुख पाहुणे म्हणून मर्चंट बँकेचे चेअरमन अजय मुथा, विरोधी पक्षनेते विनीत पाऊलबुध्दे, नगरसेविका मिनाताई चोपडा, सागर गांधी, साहित्यिक प्रा.डॉ.कॉ. महेबुब सय्यद, प्रा. बापू चंदनशिवे आदि नैसर्गिक मंचावर उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत राजेंद्र गांधी यांनी केले. प्रास्ताविकात बहिरनाथ वाकळे यांनी हॅप्पी व्हॅली पुनर्जिवन मोहिम तसेच आनंददरीची भौगोलिक, शास्त्रीय तसेच ऐतिहासिक माहिती दिली. या कार्यक्रमानंतर डोंगरगण येथील हॅप्पी व्हॅलीत वनौषधी झाडांची लागवड करण्यात आली. या वृक्षरोपण अभियानात निसर्ग मित्र मंडळ व राजेंद्र गांधी मित्र मंडळाच्या सदस्यांसह डोंगरगण व वांबोरी परिसरातील युवक व ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते.
कॉ.महेबुब सय्यद यांनी पशु-पक्ष्यांच्या सेवेसाठी सुरु झालेल्या मोहिमेने व्यापक स्वरुप घेऊन निसर्ग संवर्धन चळवळीत रुपांतर झाले असल्याचे विशद केले. बापूसाहेब चंदनशिवे यांनी शहरातील राजकारणी निसर्गप्रेमात पडणे ही दुर्मिळबाब आहे. निसर्गप्रेमी, राजकारणी व युवकांच्या पुढाकाराने एक सर्वोत्तम निसर्ग चळवळ उभी राहिली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आदेश चंगेडिया म्हणाले की, हॅप्पी व्हॅली पुनर्जिवन मोहिमेत सर्व निसर्गप्रेमी संवेदनशील भावनेने उतरले आहे. प्रारंभी पशु, पक्षी व प्राण्यांना जलसेवा देऊन, या मोहिमेचा वटवृक्ष बहरत आहे. भारतीय जैन संघटना या उपक्रमास मदत करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
पंढरी कदम यांनी या मोहिमेसाठी सुंदर आणि आकर्षक लोगो तयार केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार केला गेला. यावेळी ऋषीकेश लांडे, अभिजीत दरेकर, इंजी.अभिजीत एकनाथ वाघ, संजय वाघ, आसिफ दुल्हेखान, रोहित वाळके, यशवंत तोडमल, रामदास वागस्कर, अरुण थिटे, तुषार सोनवणे, अरुण थिटे, दिपक शिरसाठ, संदिप पवार, दिपा लांडे, उज्वला वाकळे, अश्विनी दरेकर, आसबे वहिनी, दत्ता देशमुख, संतोष गायकवाड, दत्ता वडवणीकर, अभिजीत गुरव, लहूजी लोणकर, महादेव पालवे, कुशीनाथ कुळधरण, कार्तिक पासलकर, अक्षय मते, विजय केदारे, अभिजीत चिंधे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण डहाळे यांनी केले. आभार संजय चोपडा यांनी मानले.
Post a Comment