माय नगर वेब टीम
अवघी दुमदुमली ब्राह्मणी नगरी।।भक्तीत न्हाले बाल वैष्णव।। चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा ।। प्रति विठ्ठल- रुक्मिणीसह संतांचे घडले दर्शन ।। मुक्ताईने चालविली निर्जीव भिंत,चांगदेव महाराज आले वाघावर बसून हा प्रसंग अनुभवला ग्रामस्थांनी याची देही याची डोळा।
आषाढी एकादशीच्या पवित्रदिनी संत मुक्ताईच्या राहुरी तालुक्यातील पुण्यनगरी ब्राह्मणीत व चेडगाव परिसरातील विविध शाळांनी एकापाठोपाठ दिंड्या काढून बाल वारकऱ्यांनी वृक्ष व ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून हरिनामाचा जागर केला. गावात माऊलीच्या सोहळ्याप्रमाणे मोठे रिंगण पार पडले.
प्रसंगी चिमुकल्यासमवेत रिंगणात फिरणाऱ्या त्या अश्वाने सर्वांचेच लक्ष वेधले... दरम्यान विठ्ठल- रुक्मिणीसह एकनाथ,नामदेव,तुकाराम,निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान, मुक्ताई,चांगदेव,गोरा कुंभार आदी विविध संतांच्या वेशभूषेतील मुलांनी उपस्थित ग्रामस्थांचे लक्ष वेधले.
मुलांनी हाती टाळ,भगव्या पताका, कपाळी गंध,गळ्यात माळ,डोक्यात टोपी,पांढरे शुभ्र कपडे तर, मुलींनी नऊवारी साडी घालून डोक्यावर तुळशी वृंदावन घेत सहभाग घेतला. स्व.विलास बानकर इंग्लिश मिडीयम स्कुलमधील बालकांनी विविध संतांचे पात्र साकारून विविध ऐतिहासिक प्रसंग सादर केले...कीर्तन,गवळणी, हरिपाठ, प्रबोधनात्मक मनोगत व्यक्त केले..टाळ मृदुगाचा गजर अन हरिनामाचा जयघोष करत विविध भक्ती गितावर पावल्याचा ठेका धरला. प्रसंगी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी लिखाण देखावा सादर केला..बाल दिंडीत गावातील महिलांनी लक्षणीय सहभाग घेतला.भजन गात बाल वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला. याप्रसंगी शिक्षकांनी वारकऱ्याप्रमाणे पोशाख परिधान केला होता. बानकर मिडीयम स्कुलच्या प्राचार्या सौ.अश्विनी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिंडी पार पडली.
बाजारतळावर आयोजीत कार्यक्रमात वनिता भारती यांनी सूत्रसंचालन तर,नानासाहेब हापसे यांनी आभार मानले.ब्राह्मणी जिल्हा परिषद शाळेच्या दिंडीसाठी सरपंच प्रकाश बाळकृष्ण बानकर यांनी वारकऱ्यांना भोजन दिले..
या सोहळ्यासाठी रोहिणी जिरेकर,गणेश राजदेव, माधुरी गवादे,मनोज हापसे, मुख्याध्यापक रामदास कोरडे, शिक्षक बेबी सोनवणे,संगिता साळवे,सुनिल जाजगे,दादासाहेब घोलप,विजय महामुनी,ज्ञानदेव ससे,घनःशाम सोनवणे, ज्योती ठुबे,आरती भिंगारे,कांचन गायकवाड, उज्वला देशमुख आदीं तर,तरोळीवस्ती शाळेत सुदाम शिरसाठ,माधुरी वाघ यांनी तर, चेडगाव येथील बाल दिंडी यशस्वीततेसाठी विजय कांडेकर, बाबासाहेब खांदवे,राजेंद्र फाटके, सुनंदा झांजे यांनी व एकलव्यनगर जि.प शाळेतील दिंडीसाठी लक्ष्मीकांत शिंदे व संगीता लोंढे आदींनी परिश्रम घेतले...
Post a Comment