सैनिक नगर, केकती येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
माय नगर वेब टीम
अहमदनगर - आपण पहिल्यांदा आमदार झाल्यापासून सलग 25 वर्षे विनाखंड दररोज जनता दरबारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. या जनता दरबारात विकासकामांच्या बरोबरच नागरिकांची व्यक्तीगत कामेही केली आहेत.त्यामुळेच दररोज सकाळी 300 ते 400 लोक कामे घेऊन येतात. त्या कामाचा पाठपुरावा केला जातो. त्या नागरिकांना दिलासा मिळतो, या कामातून आपण लोकप्रतिनिधी या पदाला न्याय देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्यातील सैनिकनगर, केकती येथे विविध विकासकामांचा शुभारंभ आ.कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राहुल पानसरे, बाजार समिती संचालक संदीप कर्डिले, संभाजी पवार, तुकाराम वाघुले, उद्धव कांबळे, संजय धोत्रे, माणिक वाघस्कर, राम पानमळकर, अनिल करांडे, संतोष पालवे, अशोक बोमणे, बांधकाम विभागाचे उप अभियंता ए.सी.राजभोज आदी उपस्थित होते.
यावेळी आ.कर्डिले म्हणाले की, केकती, सैनिकनगर परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. परंतु काम करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. येथील बराच परिसर लष्कराच्या हद्दीत येत असल्याने विविध कामांच्या मंजुरीसाठी खुप अडचणी येत असतात. तरी सुद्धा या भागाचा विकास करुन दाखविला आहे. या भागाला मुळा धरणाचे पाणी देण्याचे काम केले.
प्रत्येक गावातील विकासाचा लेखा जोखा मांडणार
नगर - राहुरी - पाथर्डी मतदार संघात गेल्या पाच वर्षात राज्यात सर्वात जास्त निधी विविध विकास कामांसाठी आणलेला आहे. या विकासनिधीच्या माध्यमातून मतदारसंघात केलेल्या कामांचा लेखाजोखा प्रत्येक गावाला,पुस्तकेद्वारे दिला जाणार आहे, मतदार संघातील प्रत्येक गावात शासनाचा निधी पोहचविण्याचे काम केले असल्याचेही ते म्हणाले.
Post a Comment