विधानसभेत पुन्हा पवार विरुद्ध विखे लढत रंगणार


माय नगर वेब टीम
अहमदनगर -  लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागेवरून पवार विरुद्ध विखे ही जुनी लढाई नव्याने अख्या राज्याने पाहिली. आता या लढाईचा पुढचा भाग राज्याला विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड या मतदारसंघातून दंड थोपटले असून त्यांनी भाजपनेते प्रा.राम शिंदे यांना पराभूत करण्याचा विडा उचलला आहे. मात्र, आता राम शिंदेंना निवडणून आणण्याचा जिम्मा नगरचे खासदार सुजय विखेंनी घेतला आहे. त्यामुळे राज्याला पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने पवार विरुद्ध विखे अशी रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभेसाठी अजून दोन-तीन महिन्याचा कालावधी आहे.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची चौथी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. जेमतेम दोन महिन्यांच्या तयारीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळ मतदार संघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. परंतु, पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार संपूर्ण तयारीनिशी कर्जतमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांच्या तयारीवर भाजपकडून डावपेच आखण्यात येत असून नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांनी देखील भाजपचे राम शिंदे यांच्या विजयाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे कर्जतची लढत रोहित पवार विरुद्ध सुजय विखे पाटील अशीच रंगणार असं दिसतय.
लोकसभा निवडणुकीत रोहित पवारांनी आघाडीचे उमेदवार आ. जगताप यांच्यासाठी कर्जत जामखेड मतदार संघ पिंजून काढत मतांची पेरणी केली आहे. तसेच 2-3 वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कर्जत जामखेड मधील सामना चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post