उत्कृष्ट छावणी चालवल्याने बळीराजाकडून खंडाळा छावणी चालकांचा सन्मान
माय नगर वेब टीम
अहमदनगर -
गेली तीन महिन्यापासून पशुधन वाचवण्यासाठी शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा, तसेच वेळेवर चारा उपलब्ध करून देण्याचा उत्तम प्रयत्न सर्व छावणी चालकातून करण्यात आला. परंतु नगर तालुक्यातील खंडाळा येथील चारा छावणीमध्ये छावणी चालकांनी दिलेल्या सोयी सुविधामुळे शेतकऱ्यांनीच चालकांचा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला आहे.
नगर तालुक्यातील खंडाळा येथील चारा छावणी, खंडाळा विविध कार्यकारी संस्था संचलित चारा छावणी हि संस्थेचे चेअरमन श्रीकांत पोपटराव कार्ले यांनी गेल्या तीन महिन्यापासून सुरू केली. या छावणी मध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतात काम नसल्यामुळे शेतकरी दोन पैसे मिळवण्यासाठी रोजगाराला जात होते पण छावणी मूळे कामाला जायला मिळेना, ही बाब छावणी चालकांच्या लक्षात आल्यावर श्रीकांत कार्ले यांनी सकाळी साडे पाच पासून चारा वाटप सुरू करून सकाळी नऊच्या आत चारा, पशुखाद्य व पाणी देऊन जे शेतकरी कामाला जातात त्यांच्या साठी वाट मोकळी करण्याचे काम केले.
तसेच छावणी मध्ये वेळोवेळी किर्तन, भजन असे कार्यक्रम हि घेण्यात आले. शेतकरी बाहेर गावावरून आल्याने छावणीतर्फे शेतकऱ्यांसाठी सकाळ, सायंकाळी चहा सुरू करण्यात आला. वेळोवेळी जेवणा चे ही आयोजन करण्यात आले. या तीन महिन्यामध्ये छावणी चालक व शेतकरी यांच्या मध्ये एक ऋणानुबंध निर्माण झाले. यावेळी शेतकरी बांधवांकडून छावणी चालकांनी दिलेल्या उत्तम सुविधाची पावती म्हणून चेअरमन श्रीकांत पोपटराव कार्ले, पंचायत समिती सदस्य दिपक पोपटराव कार्ले, ग्रामपंचायत सदस्य अशोक गव्हाने, मनीष कांबळे, चंद्रकांत कार्ले तसेच अमोल निमसे, भरत कार्ले, अमोल कर्डिले, यांचे सत्कार राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन करण्यात आला. यावेळी छगन महाराज शिंदे, बाळासाहेब यादव, नाना यादव, गणेश दळवी, लक्ष्मण ढमढेरे, मोहन लोटके, प्रमोद टेकाडे, विजय गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, अरुण गायकवाड, शरद कार्ले, बाबा वाघ, संतोष पोटघन, सुरेश गायकवाड, विष्णू पोटघन, बाळू पोटघन, भाऊसाहेब दळवी तसेच इतर शेतकरी व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Post a Comment