स्टेट बँकेला अठरा लाखाचा चुना ; फसवणूकीचा गुन्ह दाखल
माय नगर वेब टीम
अहमदनगर - बँकेच्या आवारात असणाऱ्या एटीएम मध्ये तांत्रिक बदल करत दोन महिन्यात अज्ञात व्यक्तीने 18 लाख 92 हजाराची रोकड काढत स्टेट बँकेला चुना लावला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील एटीएम मध्ये 5 एप्रिल ते 22 मे 2019 दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी आज भिंगार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एटीएम नंबर CFNA 0000303052 हे एटीएम मशीने स्टेट बँकेच्या आवारात उजव्या बाजूला आहे. काही अज्ञात व्यक्तींनी एटीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण करून वेळोवेळी व्यवहार केला. 18 लाख 92 लाख 500 रुपये काढून काही अज्ञात व्यक्तींनी स्टेट बँकेची फसवणूक केली आहे. तसेच बँकेच्या ऑनलाईन तक्रार वेबसाईटवर जावून (CMS) पैसे न मिळाल्याबदल तक्रार करून बँकेकडे नुकमान भरपाईची मागणी करत होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येतात बँकेच्या सहाय्यक महाप्रबंधकांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
Post a Comment