समाजात वारकरी आनंद निर्माण करतात - महंत रामगिरी महाराज


माय नगर वेब टीम

अहमदनगर- - दिंडीत रामकृष्णहरी मंत्राचे भजन करून वारकरी समाजात आनंद निर्माण करण्याचे काम करत आहेत.आपली धार्मिक, सांस्कृतिक परंपरा चालू ठेवणे ही काळाची गरज असून महाराष्ट्राला लाभलेली ही परंपरा टिकली पाहिजे असे प्रतिपादन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.

सरला बेट येथील गंगागिरी महाराजांच्या दिंडीचे सोमवारी (दि.१) नगरमध्ये आगमन झाले. या दिंडीचे प्रमुख महंत रामगिरी महाराज आणि दिंडीचे सावेडी नाक्यावर कै. नानासाहेब बारस्कर यांच्या कुटुंबियांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पावसामुळे सालाबाद प्रमाणे होणारा दिंडीचा रिंगण सोहळा होवू न शकल्याने यावेळी भाविकांना महंत रामगिरी महाराज यांनी प्रवचनातून धार्मिक उपदेश केले.

ते म्हणाले की, पिढी बदलली की विचार बदलतात परंतु कै. नानासाहेब बारस्कर कुटुबियांनी आपल्या पुर्वजांनी सुरू केलेली परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे. पीढी बदलली तरी त्यांनी आपले विचार बदलू दिले नाहीत हे विशेष आहे. भगवंताचे भजन-किर्तन करत वारकरी पांडूरंगाच्या दर्शनासाठी चालले आहेत. भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवून शेतकरी सुखी होणे आवश्यक आहे. शेतकरी सुखी होण्यासाठी भरपूर पाऊस पडू दे असे साकडे वारकरी पांडूरंगाला घालत आहेत. मुंबई प्रमाणेच आता राज्याच्या इतर भागातही चांगला पाऊस व्हावा यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी वारकरी नतमस्तक होणार असल्याचे ते म्हणाले.

कै. नानासाहेब बारस्कर यांनी गेल्या ३५ वर्षापासून सुरू केलेल्या परंपरेप्रमाणे सावेडी नाक्यावर दिंडीतील वारकर्‍यांना जेवण देण्यात आले. यावेळी प्रवचन झाले. बाळासाहेब बारस्कर, सचिन बारस्कर, सतिष बारस्कर,नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी दिंडीचे स्वागत केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post