मोकाट कुत्र्यांचा बालकांवर हल्ला, दोघे जखमी



   संग्रहित

माय नगर वेब टीम

अहमदनगर - मनपाचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या घराजवळच चार वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले तर तसेच दुसर्‍या घटनेत अकरा वर्षाची मुलगी जखमी झाली आहे. एका तासाच्या आत झालेल्या दोन घटनांमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज सायंकाळी भिस्तबाग चौक व पाईपलाईन रोड परिसरात या घटना घडल्या.

याबाबत माहिती अशी की, पाईपलाईन रोडलगत कोहिनूर मंगल कार्यालयासमोरील नंदनवन कॉलनीत काही मोकाट कुत्र्यांनी एका चार वर्षीय बालकावर हल्ला केला. यात अवधूत गायकवाड चार वर्षांचे बालक जखमी झाले. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. याच नंदनवन कॉलनीत मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांचे निवासस्थान अाहे.

दुसरी घटना भिस्तबाग चौकात घडली. यात एका कुत्र्याने अकरा वर्षीय मुलीवर हल्ला करून तिला चावा घेतला. दुर्गा पिंपळे हे सदर मुलीचे नाव आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post