आता कचेरी समोर उपोषण- आंदोलन करता येणार नाही- जिल्हाधिकारी यांचा आदेश


उपोषणकर्ते आणि आंदोलनकर्त्यांसाठी आता दुसरी जागा निश्चित

माय नगर वेब टीम

अहमदनगर - जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे आवारात/ जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण,आमरण उपोषण, धरणे आंदोलन,ठिय्या आंदोलन मोर्चे आंदोलन करण्‍यास जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध केलला असून उपोषणकर्त्यांना शांततेच्‍या व कायदेशीर मार्गाने उपोषण / आंदोलन करण्‍यासाठी सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने वरिष्‍ठ भूवैज्ञानिक, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहमदनगर यांचे कार्यालयाजवळील शासकीय मोकळी जागा निश्चित करण्‍यात आली आहे. जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

अहमदनगर जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे ठिकाण हे अत्‍यंत वर्दळीचे असून या ठिकाणी मोर्चे, आंदोलन,उपोषण, ठिय्या आंदोलन करीता उपोषणकर्ते जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या समोरच बसतात. या ठिकाणापासून शासकीय वाहन, अॅम्‍बुलन्‍स, शहरातील बाजारपेठेत जाणा-या इतर वाहनांपासून अपघात होऊ नये म्‍हणून सदरचे ठिकाण हे उपोषण, आंदोलनासाठी प्रतिबंधात्‍मक घोषित करण्‍यात आले आहे. उपोषणकर्ते/ आंदोलनकर्ते यांना शांततेच्‍या व कायदेशीर मार्गाने उपोषण करण्‍यासाठी दुस-या ठिकाणी वरिष्‍ठ भूवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहमदनगर यांचे कार्यालयाजवळील मोकळी जागा निश्चित करण्‍यात आलेली आहे. त्‍याचा पत्‍यासहीत फलक जिल्‍हाधिकारी कार्यालया समोरील भिंतीला दर्शनी भागात लावण्‍यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post