माय नगर वेब टीम
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आहे. या घटनेत पाणलोट क्षेत्रातील सात गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून 21 जण बेपत्ता झाले आहेत. तर तीन मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. अलोरे-शिरगाव पोलिस चौकीच्या हद्दीत मंगळवारी (02 जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

सततच्या पावसामुळे रात्री साडेआठच्या सुमारास सुरुवातीला तिवरे धरण भरुन वाहू लागले. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि खळबळ माजली.
Post a Comment