
माय नगर वेब टीम
इंग्लंड - भारताच्या विजयाने बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले आहे. आता दोन जागांसाठी तीन संघांमध्ये चुरस बघायला मिळणार आहे. इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर भारताने बांगलादेशवर विजय मिळवून सेमीफायनलला धडक मारली आहे. 13 गुणांसह भारत दुसऱ्या स्थानावर आहे. या विजयाने बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले.
वेस्ट इंडिजला पराभूत करून लंकेने सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सध्या त्यांचे 8 गुण झाले असून पुढच्या सामन्यात त्यांना भारताशी सामना करावा लागेल. यात त्यांना मोठा विजय मिळवल्यानंतरही बांगलादेश आणि पाक आणि इंग्लंड यांचा एक पराभव तोसुद्धा मोठ्या फरकाने होण्याची प्रार्थना करावी लागेल.
ऑस्ट्रेलियायाने इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंडचा पराभव करून गुणतक्त्यात 14 गुणांसह पहिले स्थान कायम राखले आहेK. ऑस्ट्रेलियाने सेमिफायनलला स्थान पक्कं केले आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडची पुढची लढत इंग्लंडशी आहे.
न्यूझीलंडचे 11 गुण झाले आहेत. त्यांचा एक सामना बाकी असून यात त्यांना विजय मिळवावा लागेल. या सामन्यावर इंग्लंड आणि पाकच्या सेमीफायनल प्रवेशाचे गणित ठरणार आहे.
न्यूझीलंडने आतापर्यंत 8 सामन्यात 5 विजयासह 11 गुण मिळवले आहेत. एका सामन्यात पावसाने खोडा घातला. त्यांचा पुढचा सामना इंग्लंडशी होणार आहे. यात पराभव झाल्यास इतर संघांच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून रहावे लागेल. पाकिस्तानने पुढच्या सामन्यात विजय मिळवला तर त्यांचेही 11 गुण होतील. पण धावगतीच्या जोरावर न्यूझीलंड वरचढ ठरेल.
Post a Comment