न्याय मिळवून देण्यासाठीच संघटनेचे कामकाज - प्रकाश पोटे



माय नगर वेब टीम

अहमदनगर- अन्यायाविरुद्ध आवाज उठवून अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनआधार सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. आमची संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. ज्या उद्देशाने आम्ही संघटना सुरू केली, त्याला अधीन राहून आम्ही सर्वजण काम करीत आहोत. संघटनेच्या विविध पदाधिकार्‍यांच्या नियुक्तया करून त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. सामाजिक कार्याची आवड असणार्‍यांना जनआधार सामाजिक संघटनेने काम करण्याची संधी दिली आहे, असे प्रतिपादन संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी केले.

जनआधार सामाजिक संघटनेची विशेष बैठक येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हा संघटकपदी हभप भाऊसाहेब बेरडमहाराज (निंबोडी), पारनेर तालुका कार्याध्यक्षपदी अंकुश ठोकळ (कामरगाव), नगर दक्षिण जिल्हा कार्याध्यक्षपदी हभप रमेश दळवी (हंगा) यांना संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वजीर सय्यद, बाबासाहेब करांडे, महेश घोगरे, दीपक गुगळे, अमित गांधी, तुकाराम वाघ, अजय सोलंकी, नीलेश सातपुते, राहुल बांगर, महेश जाधव आदी उपस्थित होते.

पोटे म्हणाले की, बेरड, ठोकळ, दळवी यांच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या असून, त्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्‍न हाताळून ते सोडविले जातील. आतापर्यंत आमच्या संघटनेच्या अनेकांना न्याय मिळवून देण्यात आला असून, संघटनेत येणार्‍यांची संख्या त्यामुळेच दिवसेंदिवस वाढत आहे, असे ते म्हणाले.

वजीर सय्यद म्हणाले की, नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी संघटनेची रूपरेषा समजून घेऊन त्याप्रमाणे काम करावे. काम करीत असताना समाजाचे प्रश्‍न जाणून घ्यावेत. ते सोडविण्यासाठी प्रसंगी आंदोलन उभारावे लागले, तरी चालेल. आपण सर्वजण मिळून एक मोठे कार्य करू या, असे सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post