छावण्यांसाठीचे आंदोलन पेटले : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला आंदोलनकर्त्यांनी इशारा






माय नगर वेब टीम
अहमदनगर - प्रशासनाने बंद केलेल्या तालुक्यातील चार चारा छावण्या त्वरीत चालू कराव्यात, अन्यथा उद्या मुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. तसेच छावण्या सुरू करण्याचा निर्णय न झाल्यास सामूहीक विष प्राशन करणार असल्याचाही इशारा  आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. रात्रभर आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या दिला.

नगर तालुक्यातील चारा छावण्या बंद केल्याने नगर तालुक्यातील शेतकरी आणि शिवसैनिकांनी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली काल रास्ता रोको आंदोलन चालू केले होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी  काल संध्याकाळ पासून तहसील कार्यालयात आंदोलन चालू करण्यात आले आहे. हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. उद्या दुपारपर्यंत सरकारने चारा छावण्याबाबत निर्णय न घेतल्यास सामूहिक विष प्रशासन करणार असल्याचा आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील सरकारी कामकाज भ्रष्टाचाराने बरबटलेला असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केला आहे. त्यांनी थेट निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून पैसे मागितल्याचा आरोप केला आहे.
छावण्यांनबाबत तात्काळ सुरु करण्याचे आदेश न दिल्यास मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
दरम्यान टॅग नसणाऱ्या छावण्यांना दंडात्मक कारवाई करण्याचे नियमात असतांना प्रशासनाने थेट मान्यताच रद्द केली असल्याचे कार्ले यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post