माय नगर वेब टीम
अहमदनगर- नगर मनमाड ते सोलापूर महामार्गावरील बायपास चौकात गतिरोधक बसावावे या मागणी साठी नगर कल्याण महामार्गा वरील नेफ्ती चौकातआज सकाळी दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. पंधरा दिवसाच्या आत गतिरोधक बसविण्यात येईल असे लेखी आश्वासान सार्वजनिक विभाग राष्ट्रीय महामार्ग विभागणे दिल्यानंतर हे आंदोलन उठविण्यात आले.
नगर-कल्याण महामार्गावर १७ जुलै रोजी महाविद्यालयांमधील विद्यार्थीनीचा नेप्ती बायपास चौकात अपघात झाला. या अपघातामध्ये तिचा मृत्यू झाला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व प्रवासी गंभीर जखमी झाले. नगर-कल्याण हा राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर बायपास जोडला. या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक व हवे तेवढे दिशादर्शक फलक गतिरोधक नाही. या चौकाच्या आजूबाजूस अनेक छोटी गावी, महाविद्यालय, नेप्ती कांदा मार्केट, दूध व्यावसायिक, असल्यामुळे या चौकातून प्रवास करणाऱ्या संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बायपास रोडवर मनमाड कडून सोलापूर ला जाणारी अनेक अवजड वाहने प्रवास करतात. तसेच राष्ट्रीय महामार्गावरून गतिरोधक नसल्याने अनेक छोटी व मोठी वाहने भरधाव वेगाने या चौकातून जातात. दोन्ही रोडला गतिरोधक व दिशादर्शक फलक नसल्यामुळे या चौक चौकात अपघात होणे ही नित्याचीच बाब आहे. अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी त्या चौकांमध्ये चारी बाजूने गतिरोधक व मोठ्या महामार्गावरील चौकात सर्कल तयार करण्यात यावे यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज नगर-कल्याण महामार्गावरील व्यक्ती बायपास चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जर १५ ऑगस्टच्या आत निंबळक, नेप्ती, केडगाव, अरणगाव मधील प्रत्येक चौकात गतिरोधक बसवले नाही तर कुठलीही सूचना न देता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सरपंच संजय जपकार,विलास लामखडे यांनी दिला. यावेळी देवा होले, अंबादास पुंड, नंदू जाधव, ज्ञानेश्वर जपकर, अजय लामखडे, रामदास फुले, अरुण कापसे, सुदाम होळकर, भानुदास फुले, अशोक जपकर, राजाराम जपकर, नाथा जपकर, फारुख सय्यद, अशोक गवळी, एकनाथ जपकर, अनिल पवार, विलास जपकर, सोमा जपकर, अतुल जपकर, भैरवनाथ जपकर, बंडू जपकर, बाळू जपकर, शिवाजी गाडेकर, बंडू कांडेकर, ग्रामस्थ व छत्रपती इंजिनीरिंग कॉलेज विद्यार्थी तसेच उपस्थित होते.राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपभियांता संतोष काळे व बायपास महामार्ग्चे दत्तात्रय बांगर रमेश ढोबळेउपस्तीथ होते.आंदोलन प्रसंगी अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगर तालुका पोलीस स्टेशन च्या वतीने बंदोबस्त देण्यात आला.होता.
Post a Comment