ब्रेकिंग :- शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्देवी अंत





माय नगर वेब टीम

अहमदनगर - शेततळ्यात दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अरणगाव शिवारात आज घडली.

आदित्य मोरे(वय १०) व अनुज मोरे (वय१३)अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलाची नावे आहे.

याबाबत माहिती अशी की, मोरे परिवारातील तिघे जण जांभुळ खाण्यासाठी अरणगाव परिसरात शेततळ्या जवळ गेले होते. त्यावेळी सोबत आणलेली पाण्याची बाटली शेजारीच असलेल्या शेततळ्यात पडली. बाटली काढण्यासाठी आदित्य व अनुज शेततळ्यात उतरले. पाणी जास्त असल्याने त्यांना पाण्याचा अदाज आला नाही.दरम्यान त्यांच्यासोबत असणारा तिसरा सात वर्षाचा मुलगा घाबरल्याने तो घरी पळून घरी गेला. त्याने काही वेळ कोणालाच काही सांगितले नाही. परंतु काही वेळाने कुटुंबीयांनी शोधाशोध केल्याने आणि छोट्या मुलाला विचारले असता, त्याने सोबत असलेली मुले ही  शेततळ्यावर गेले असल्याचे त्याने सांगितले. घटना समाजात इतर दोघाच्या नातेवाईकांनी शेत तळ्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत शेततळ्यात पडलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी अंत झालेला होता. ग्रामस्थांनी त्यांना शेततळ्यातून बाहेर काढून तातडीने दवाखान्यात हलविले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी  घोषित केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post