चांगला पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे : आ. राहुल जगताप



साकतला बंधारा दुरुस्ती कामास शुभारंभ । सुकाणू समितीच्या पाठपुराव्याला यश

माय नगर वेब टीम

अहमदनगर: पाण्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे यामुळे चांगला पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना आ. राहुल जगताप यांनी केली. नगर तालुक्यातील साकतखुर्द येथील सीना नदीवरील केटीवेअर बंधारा दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ आ. जगताप यांच्या शुभहस्ते बुधवारी (दि.12) पार पडला यावेळी ते बोलत होते.

आ.जगताप म्हणाले, मी प्रत्यक्ष कामांचेच नारळ फोडतो. पोकळ आश्वासने देत नाही. बंधारा दुरुस्तीची मागणी अनेक दिवसांची होती त्याचे काम सुरु झाले याचा आनंद आहे.

याप्रसंगी सरपंच बापू केदारे, उपसरपंच पाराजी चितळकर, बाजार समितीचे अभिलाश घिगे, दत्तात्रय चितळकर, भानुदास पवार, मोहन पवार, पोपट पवार, से.सो. अध्यक्ष अशोक शिंदे, ग्रा. पं. सदस्य तात्या वाघमोडे, किशोर पवार, बाबा चितळकर,j पोपट पवार, शिवाजी शिंदे, उद्धव शिंदे, चांगदेव शिंदे, लक्ष्मण निमसे, बंडू निमसे, धर्मा निमसे, दादा वाघमोडे, बाळू बेरड, सुकाणूचे अविनाश पवार, बापू वाघमोडे, बापू निमसे, शेखर बोचरे, शरद निमसे, पांडुरंग शिंदे, रामदास चितळकर, प्रा. अविनाश निमसे अभियंता सचिन झनझने, बापू खामकर, नितीन अण्णा डुबल यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. बंधारा दुरुस्तीचे काम आ. जगताप यांच्या स्वखर्चाचे असून याचा फायदा साकतसह परिसरातील अनेक गावांना होणार आहे.

येथील बंधाऱ्यातुन मोठया प्रमाणात पाण्याची गळती होत असल्यामुळे पाणी टिकत नव्हते परंतु या कामासाठी सुकाणू समितीने सातत्याने पाठपुरावा केला. दहा बारा वर्षां पासूनचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post