ब्रेकिंग... बापानेच केला मुलाचा दोरीने गळा आवळून खून


माय नगर वेब टीम
संगमनेर
मशीन विकण्यास विरोध करतो म्हणून संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारात बापाने दोरीने गळा आवळून मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंकुश दत्तात्रय हुलवळे (वय २८) असे मुलाचे नाव आहे. संगमनेर पोलिसांनी दत्तात्रय रामचंद्र हुलवळे (वय ५५) याच्यााविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात दत्तात्रय हुलवळे कुटुंबीय राहते. वडील दत्तात्रय हुलवळे यांना मुलगा अंकुश दत्तात्रय हुलवळे हा मशीन विकण्यास तसेच घरातील वस्तु विकण्यास नेहमी विरोध करीत होता. वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन मुले अंकुश हुलवळे व प्रविण हुलवळे यांच्या नावावर करण्यात आली होती. गायींचा चारा कापण्याचे मशीन विकण्यास अंकुश याने वडिलांना विरोध केला. याच रागातून सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय हुलवळे याने अंकुश याचा दोरीने गळा आवळून खून केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post