नवी दिल्ली – जागतिक बाजारात संमिश्र वातावरण आहे. अमेरिका चीन व्यापारयुद्धाचा शेअर आणि चलन बाजारावर परिणाम होत असल्यामुळे स्थानिक बाजारातील वातावरण सावध आहे. भारतीय बाजारपेठेत सोमवारी सोन्याच्या दरात 65 रुपयांची वाढ झाली.
मात्र, चांदीच्या दरात 175 रुपयांची घट झाली. अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार दिल्ली सराफात सोमवारी शुद्ध सोन्याच्या दरात 65 रुपयांची वाढ होऊन ते 33,018 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर स्टॅंडर्ड सोन्याच्या दरातही 65 रुपयांची वाढ होऊन या सोन्याचे दर 32,848 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

Post a Comment