राज्यात युतीला ३८ जागा मिळतील - केंद्रीयमंत्री आठवले



माय नगर वेब टीम

वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळणार नाही, विधानसभेला देखील वंचित आघाडीचा लढल्यास त्यांचे स्वागतच आहे, कारण त्यांचा सर्वाधिक फायदा हा महायुतीच्या होईल, असा दावा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

लोकसभेला जनता आघाडी अथवा युतीलाच निवडून देते, त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही. असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे. राज्यात भाजप – शिवसेना युतीला ३८ तर देशात २६0 जागा मिळतील, असंही ते म्हणाले.

राज्यामध्ये १५ वर्ष कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती, मात्र त्यांनी सिंचन व्यवस्थेचे योग्य नियोजन केले नाही. आघाडीने सत्ता काळामध्ये कामे केली असती तर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post