‘विजयी उमेदवार व विरोधकांना सोडणार नाही’
माय नगर वेब टीम
मुंबई - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जात होता. शिवसेनेचा हा गड तब्बल 20 वर्षांनी खालसा झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनी अखेर चंद्रकांत खैरे यांना पराभवाची धूळ चाखण्यास भाग पाडले.
मात्र, शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी हा पराभव चांगलाच जिव्हारी लागल आहे. खैरेंनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी ‘मातोश्री’वर भेट घेतली. आपला पराभव का आणि कसा झाला, याचा अहवाल दिला. ‘मातोश्री’वरील बैठक संपल्यावर चंद्रकांत खैरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘विजयी उमेदवार इम्तियाज जलील आणि विरोधकांना सोडणार नाही,’ असे खैरेंनी सांगितले आहे. आता खैरेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर औरंगाबाद नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील काय प्रत्युत्तर देतात, हे पाहाणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

Post a Comment