शहराच्या स्थापना दिनी रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी ; मुख्यमंत्र्यांना निमंत्रण


माय नगर वेब टीम

अहमदनगर - मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या आपल्या नगर शहराचा ५२९ व्या स्थापना दिन येत्या २८ मे रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या नगर जल्लोष ट्रस्टच्या वतीने ‘ नगर जल्लोष ’ या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यत आले आहे. मंगळवार दि.२८ मे ला सावेडी येथील जाँगिग पार्क वर सायंकाळी ६.00 वा. हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. यासाठी नगर जल्लोष च्या वतीने खा.दिलीप गांधी यांच्या नेतृत्वा खाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन निमंत्रण पत्र देण्यात आले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले आहे. या कार्यक्रमात सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रतिल बहुमोल योगदान दिल्या बद्दल उद्दोजक नरेंद्र फिरोदिया यांना ‘नगर भूषण’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती नगर जल्लोष अध्यक्ष सागर बोगा यांनी दिली.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यासाठी भाजप युवामोर्चाचे चिटणीस महेश सब्बन, सागर बोगा, अजय म्याना, अंकुश बुरा, गणेश साळी, राकेश मुनगेल, दीपक गुंडू व सचिन बोगा आदि उपस्थित होते.

याबद्दल अधिक माहिती देतांना नगर जल्लोषचे उपाध्यक्ष रत्नाकर श्रीपत यांनी सांगितेले, या सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य आर्कषण सई लोकुर (मराठी बिग बॉस फेम) या असून, आपल्या नगरची शान अंजली व नंदिनी गायकवाड, योगेश रणमले (मराठी सारेगमप फेम), गायत्री शिंदे (रायजिंग स्टार फेम) यांचाही सहभाग असून त्यांचे सादरीकरण ही होणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिध्द निवेदिका दिप्ती भागवत या करणार आहेत. तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नगरमधील अल्पावधीतच नावारुपाला आलेले पद्मनादम् ढोल, ताशा, ध्वज पथकाचे विशेष
सादरीकरण आहे. नगर मधील प्रसिध्द सावरा डान्स ग्रुप व व्हिक्टर डान्स अकॅडेमीच्या कलाकारांचे विविध डान्स प्रकार पाहण्याची संधी नगकरांना मिळणार आहे.

नगर जल्लोष या सास्कृतिक कार्यक्रमा साठी मुख्य प्रायोजक आय लव्ह नगर असून, प्रायोजक अहमदनगर महानगरपालिका आहे, सहप्रायोजक पुणे येथील प्रसिध्द पेढी श्रीमंत पेशवाई क्रिएशन, बंधन लॉन, हॉबी डिझायनर स्टुडिओ हे आहेत. त्याच प्रमाणेमहारुद्र सिस्टिम, प्रविण कोकाटे आणि असोसिएटस, मे. नारायणराव कोडम एजन्सीज्,अपूर्वा केटरर्स, यादगार फोटोग्राफी, महाराष्ट्र पब्लिक स्कूल, सुरवि डिजीटल कलर लॅब,विजय पेपर मार्ट, अहमदनगर पॅथकेअर, टाईम्स स्टील फर्निचर, विझार्ड कॉम्प्युटर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सर्व नगरकरांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व प्रायोजक व नगर जल्लोषच्या वतीने करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post