वाचा सविस्तर
माय नगर वेब टीम
अहमदनगर - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आल्यामुळे दक्षिण लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार आमदार संग्राम जगताप व भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून विजयाचा दावा केला जात आहे. त्याचबरोबर नगरमध्ये आम्हीच किंग असल्याचा दावा आ. जगताप व डॉ. विखे पाटील समर्थकांकडून केला जात आहे. दरम्यान मतदारसंघ निहाय आकडेमोड आणि बेरीज जुळविण्याचे काम जोरात सुरू आहे.
जगताप समर्थकांकडून नगर, श्रीगोंदयात लीड मिळणार असल्याचे बोलले जाते. तर विखे समर्थकांकडून राहुरी, पारनेरवर लीड मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची गुरुवारी (दि.23) मतमोजणी होत असून, त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी एकाच वेळी होणार आहे. त्यासाठी शिर्डी व नगर लोकसभा मतदार संघासाठी 168 टेबल लावण्यात येणार असून दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी सुमारे 22 ते 25 फेर्यांमध्ये होणार आहे. सकाळी प्रत्यक्षात मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे.
नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी नगर एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम क्र.2 व गोदाम क्रमांक 4 येथे स्ट्रॉग रूम येथे मतदान यंत्रे ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी दोन्ही मतदारसंघांत अनुक्रमे 84 टेबल ठेवण्यात येणार असून, या 168 टेबलांवर झालेल्या मतदानाची म्हणजे 22 लाख 13 हजार 982 मतांची मोजणी केली जाणार आहे. या मतमोजणीसाठी 1 हजार 350 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नगर मतदारसंघाची 23 एप्रिल रोजी तर शिर्डी मतदारसंघाची 29 एप्रिल रोजी मतदान झाले. नगर मतदारसंघातील 2 हजार 30 मतदान केंद्रांवर 11 लाख 91 हजार 521 तर शिर्डी मतदारसंघातील 1 हजार 710 मतदान केंद्रांवर 10 लाख 22 हजार 461 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानुसार नगर मतदारसंघातील मतमोजणी नगर एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या दक्षिणेकडील गोदाम क्रमांक 1 येथे तर शिर्डी मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्रमांक 3 येथे होणार आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी प्रत्येकी 6 कक्ष रहाणार आहेत.
मतमोजणीसाठी एका मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल ठेवले जाणार आहेत. मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे नगर मतदारसंघातील मतमोजणी 84 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. शिर्डी मतदारसंघात देखील 84 टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलावर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरिक्षक यांची नियुक्ती केली आहे.
दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणी एकाच ठिकाणी मात्र वेगवेगळ्या गोदामात होणार आहे. यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. या दोन्ही गोदामांभोवती थ्री टायर सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. प्रत्येक गोदामाभोवती पहिल्यांदा केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे 26, त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलाचे 26 व शेवटी जिल्हा पोलीस दलाचे 19 अधिकारी व कर्मचार्यांची सुरक्षा व्यवस्था आहे.
टपाली मतपत्रिका मोजण्यासाठी मात्र एकच टेबल असणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. पोस्टल बॅलेटसाठी प्रत्येकी एका मतदारसंघात एक उपजिल्हाधिकारी असणार आहे. तसेच 300 राखीव अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. सुरवातीला सैनिकांनी केलेल्या मतदानांची मतमोजणी होणार असून त्यानंतर पोस्टल मत मोजली जाणार आहेत.
व्हीव्हीपॅटचा अंतिम निर्णय ग्राहय धरला जाणार
जिल्ह्यात दोन लोकसभा मतदार संघ आहेत. त्यामध्ये नगर मतदार संघात नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, पाथर्डी-शेवगाव, राहुरी असे सहा विधानसभा मतदार संघ आहेत. तर शिर्डी लोकसभा मतदार संघात राहता, कोपरगाव, अकोले, संगमनेर, नेवासा, श्रीरामपूर असे सहा विधानसभा मतदार आहेत. या मतदार संघातून एकूण मतदानकेंद्रापैकी कोणत्याही 5 मतदान केंद्राची निवड करून व्हीव्हीपॅट मधील पावत्यांची मतमोजणी करण्यात येणार आहे. दोन्ही मतदार संघातील एकूण 60 व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाणार आहे. यामध्ये इव्हीएम मशिन व व्हीव्हीपॅट मध्ये काही तफावत आल्यास व्हीव्हीपॅटचा अंतिम निर्णय ग्राहय धरला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
विधानसभानिहाय मतदान फेर्या
शिर्डी लोकसभा मतदान फेर्या पुढीलप्रमाणे ः अकोले-22, संगमनेर-20, शिर्डी-20, कोपरगाव-20, श्रीरामपूर-23, नेवासा-20. नगर लोकसभा मतदान फेर्या ः शेवगाव-पाथर्डी- 27, राहुरी-22, पारनेर-27, नगर-21, श्रीगोंदा-25, कर्जत-जामखेड-26 फेर्या होण्याची शक्यता आहे.

Post a Comment