…तर महाराष्ट्रतील घडामोडी वेगाने बदलतील : खा.सुजय विखे





माय नगर वेब टीम

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने बदलतील असे वक्तव्य अहमदनगर लो कसभा मतदार संघाचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूक झाली आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीतील सहकार्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. तसेच, शिवसेनेने माझ्या कार्यक्षेत्रात जे उत्कृष्ट काम केलं, उद्धव साहेबांचे आभार मानायला आलो होतो. माझ्या विजयात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अशी प्रतिक्रियाही त्यांनी माध्यमांना दिली.

याचबरोबर, जे संकटांच्या काळात पाठीशी उभे राहिले, त्या नेत्यांचे आभार मानण्यासाठी भेटत आहे. शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रात हालचालींना वेग येईल. असेही त्यांनी म्हंटले. तसेच, राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच येईल. मुख्यमंत्र्यांनी जसा माझा सन्मान केला, तसा माझ्या वडिलांचाही सन्मान करतील, अशी अपेक्षा आहे. असेही सुजय विखे यांनी म्हंटले.

तसेच, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मी केंद्रीय नेतृत्त्वावर काही बोलणार नाही परंतु राज्यातील नेतृत्त्वाने आत्मचिंतन करायला हवे. निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनाधार मिळत असेल, तर तो का मिळाला याचा विचार काँग्रेसने करावा. निवडणुकीत लोकांनी काँग्रेसला नाकारलंय हे त्यांनी लक्षात घ्यावं असेही त्यांनी म्हंटले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post