अहमदनगर
कर्जत शहरांमध्ये गवंडी गल्ली येथे रात्री घराच्या गच्चीवर खेळत असताना आयर्न विनय कुमार निषाद (वय ७ वर्ष) व जानवी विनय कुमार निषाद (वय ३ वर्ष) या दोघांना विजेच्या प्रवाहाचा धक्का बसला आणि दोघा बहिण- भावाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात व शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रात्री (दि.२७) साडेसात वाजता मूळचे उत्तर प्रदेशमधील असलेले विनय कुमार निषाद हे घराला रंग देण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे विनय कुमार हे कामावर गेले होते. घरांमध्ये त्यांची पत्नी व दोन मुलेही होती. संध्याकाळी मुलांची आई घरांमध्ये स्वयंपाकाची काम करत असताना ही दोघे मुले घराच्या गच्चीवर खेळत असताना अनावधानानं विजेचा प्रवाह असणारी वायर त्यांच्या हातामध्ये आली. क्षणाचाही विलंब न होता दोघांनाही हातामध्ये पकडलेल्या वायरमधील विजेच्या जोरदार धक्का बसला. यामुळे दोन्हीही मुले शेजारील घराच्या पत्र्यावर फेकली गेली आणि जागेवरच गतप्राण झाली.

Post a Comment