नगर जिल्ह्यातही मुलीचं लयभारी ; जिल्ह्याचा निकाल ८८.०७ टक्के


माय नगर वेब टीम
अहमदनगर
 राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०१९ मध्ये घेतलेल्या १२ वीच्या परीक्षेच्या निकालात नगर जिल्ह्याचा निकाल ८८.०७ टक्के लागला असून पुणे विभागाचा निकाल ८७.६५ टक्के आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा प्रथम (८८.१९ टक्के), नगर जिल्हा द्वितीय क्रमांकावर (८८.०७ टक्के) तर पुणे जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर (८७.६५ टक्के) आहे. निकालात नगर जिल्ह्यासह विभागातही मुलींची बाजी मारली आहे.

नगर जिल्ह्यातून ३६ हजार ८१८ मुले आणि २५ हजार ५२२ मुली असे एकूण ६२ हजार ३४० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३१ हजार ०३९ मुले व २३ हजार ८६३ मुली असे एकूण ५४ हजार ९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणारां मध्ये मुलांचे प्रमाण ८४.३० टक्के तर मुलींचे प्रमाण ९३.५० टक्के एवढे आहे. जिल्ह्यात राहुरी तालुक्याचा सर्वाधिक ९२.१९ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.२९ टक्के, कला शाखेचा ७५.४६, वाणिज्य शाखेचा ९२.७५ टक्के निकाल लागला आहे.

तालुकानिहाय निकालाची टक्केवारी -

अकोले- ८२.००

जामखेड- ९२.८७

कर्जत- ९१.८७

कोपरगाव- ८७.४१

नगर- ८९.०६

नेवासा- ८३.६९

पारनेर- ८९.८२

पाथर्डी- ९२.४०

राहाता- ८७.२९

राहुरी- ८३.८४

संगमनेर-९०.०४

शेवगाव- ९२.१५

श्रीगोंदा- ९०.०३

श्रीरामपूर- ७६.७४

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post