टँकरवरुन पडून एकाचा मृत्यू!

माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरातील वसंतटेकडी येथील जलकुंभावर टँकरमध्ये पाणी भरत असतांना टँकरवर चढलेला कर्मचारी घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

विलास उर्फ सखाराम नारायण कराळे (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (दि.२७) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मनपाच्या वतीने खासगी संस्थेमार्फत शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

सोमवारी सायंकाळी वसंतटेकडी येथे जलकुंभावर टँकरमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू असतांना या संस्थेच्या टँकरवरील कर्मचारी कराळे हा टँकरवर चढला होता.

यावेळी तोल जावून घसरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तो मयत झाल्याचे सांगण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post