अमित शहा म्हणतायेत भाजपने बहुमताचा आकडा गाठला


माय नगर वेब टीम

नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यामध्येच भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. सातव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप ३०० च्या वर जागा जिंकेल आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.
मला विश्वास आहे की भाजपने सहाव्या टप्प्यानंतर बहुमताचा आकडा गाठला आहे. आता अंतिम टप्प्यातील मतदानानंतर हा आकडा वाढून ३०० च्या पुढे जाईल. लोकसभेच्या अंतिम म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे. पक्षाला बहुमतासाठी २७२ जागांची गरज आहे. गेल्या २०१४ मधील निवडणुकीत भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. दरम्यान, लोकसभा निवडणूक सुरू असताना राजकीय वर्तुळात तिसरी आघाडी स्थापन करण्याचा विषय चर्चेत आहे. दक्षिणेतील प्रादेशिक पक्ष काँग्रेस आणि भाजपविना तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. तेलंगाणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे तिसऱ्या आघाडी स्थापन करण्यासाठी बैठका घेत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post