माय नगर वेब टीम
कंगना राणावतची बहीण रंगोलीने अभिनेता आदित्य पांचोलीवर गंभीर आरोप लावत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये रंगोलीने ई-मेलवरून पांचोलीवर मारहाण आणि लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत.
54 वर्षीय आदित्यने कंगना जेव्हा बॉलीवूडमध्ये नवीन आली होती, तेव्हा तिला मारहाणी करत तिचे लैंगिक शोषण केले होते. तक्रारीत हेदेखील म्हटले की, आदित्यची पत्नी जरीना वहाबलादेखील या प्रकरणाची संपूर्ण माहिती होती. त्यावेळी कंगना-आदित्यचे अफेअर होते आणि ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे.

Post a Comment