बळीराजासाठी खुशखबर...!



माय नगर वेब टीम

पुणे- महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होण्यास सुरुवात झाली असून शनिवारपासून विदर्भ आणि कोकणात, तर 1 तारखेपासून राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यानंतर 2 जूनला संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात अजून मान्सून पूर्व पाऊसही न आल्याने शेतकऱ्यांसह प्रत्येक जण पावसाची वाट पाहतोय. त्यात मुंबईसह राज्यभरात नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. पण आयएमडीच्या अंदाजामुळे आता पावसाच्या आगमनाची उत्सुकता ताणली आहे. 3 आणि 4 जूनलाही राज्याच्या काही भागात पूर्व मोसमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post