राज्य मंत्रिमंडळ विस्तारात 'या' नेत्यांना मिळणार मंत्रिपद?
माय नगर वेब टीम
मुंबई - राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 5 ते 10 जूनच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. काही मंत्रिपद ही नव्या लोकांना दिली जाणार आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळात नवीन नावांची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू झाली आहे.
हा मंत्रिमंडळ विस्तार 23 मे रोजी लोकसभेच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जर भाजपला चांगला लागला तर राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षिरसागर, विजयसिंह मोहिते पाटील या काँग्रेस-राष्ट्रवादीतील बंडखोर नेत्यांना मोठी खाती देण्यात येणार असल्याची चर्च सुरू आहे.
लोकसभा निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहे. त्यामुळे नव्या नावांची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभेची रणधुमाळी सुरू झाल्यापासून भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अनेक मोठे धक्के दिले. त्यामुळे आता या विस्तारात काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांचा निकाल लागण्याआधीच विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही. कारण जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर काँग्रेस-राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या अनेक नेत्यांना मोठी पद दिली जाणार असल्याची चर्चा आहे. 5 ते 10 जून दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी जोरदार चर्चा सध्या मंत्रालयात सुरू आहे.



Post a Comment