कृषी सेेवा केंद्र चालकांचे धाबे दणानले
जिल्हाधिकार्यांचे आदेश । 18 पथकांकडून दिवसभर तपासणी ।
माय नगर वेब टीम
अहमदनगर – नगरमध्ये सापडलेल्या मुतदबाह्य कीटकनाशके प्रकरणाची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गंभीर दखल घेतली असून, शनिवारी कृषी विभगाच्या 18 पथकांनी जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रांची झाडाझडती घेतली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने छापासत्र सुरू झाल्याने कृषी सेेवा केंद्र चालकांचे धाबे दणानले आहेत.
नगरमध्ये पृथ्वी अॅग्रो सेर्व्हिसेस या बड्या कृषी सेवा केंद्रामध्ये मुदतबाह्य कीटक नाशके आढळली. मुदत संपलेल्या कीटकनाशकांचे लेबल बदलून ते विक्रीसाठी बाजारात पाठविले जात होते. पृथ्वी अॅग्रो सर्व्हिसेस हे जिल्हा स्तरावरील कृषी निविष्टा विक्री केंद्र आहे. पृथ्वी अॅग्रोवर छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी लगेच कृषी विभागाने विक्रीबंदचे आदेश दिले. त्यांच्यासह ज्या ज्या ठिकाणी पृथ्वी अॅग्रोचा माल वितरित झाला, त्या सर्व ठिकाणी विक्री बंद ठेवण्यास सागण्यात आले आहे.

Post a Comment