विरोधी पक्ष नेतेपदाचा चेंडू हायकमांडच्या कोर्टात
माय नगर वेब टीम
मुंबई - काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी तीन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. विरोधीपक्ष नेता निवडीचा अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आल्याचा ठराव आमदारांनी एकमताने मंजूर केला. त्यामुळं विरोधी पक्ष नेता निवडीचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात गेला आहे.
काँग्रेस विधीमंडळ बैठकीत तीन नावांची चर्चा प्रामुख्याने झाली. यात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार आणि वर्षा गायकवाड यांच्या नावाची बैठकीत चर्चा झाली. गटनेता निवड अंतिम निर्णय दिल्लीत हायकमांड घेण्याचा निर्णय करण्यात आला आणि सर्व आमदारांनी यासाठी एकमताने पाठिंबा दिला. दरम्यान संगमनेर कर फटाके फोडण्याच्या तयारीत असून माजी मंत्री राधाकृष्ण विखेंचे कट्टर प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांनाच विरोधी पक्षनेते पद मिळणार का याकडे सर्वच लक्ष लागले आहे.

Post a Comment