माय नगर वेब टीम
मुंबई – चालू शैक्षणिक वर्षापासून मराठा समाजातील मुलांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षणाचा लाभ व्हावा, यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आणलेल्या वटहुकूमावर राज्यपास सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली आहे . राज्य सरकारने आणलेल्या वटहुकूमामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजातील मुला-मुलींसाठी राखीव जागा असतील. पदवी शिक्षणासाठीही हे आरक्षण लागू होणार आहे.
महाराष्ट्र राज्य आरक्षण (शिक्षण संस्थांमधील प्रवेश, सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या आणि राज्यातील पदे) सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग (सुधारणा) वटहुकूम २०१९ वर राज्यपालांनी स्वाक्षरी केली. दरम्यान,मराठा आरक्षणाला विरोध करणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते वैद्यकीय पदव्यूत्तर प्रवेश प्रक्रियेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुंबई हायकोर्टात आव्हान देणार आहेत. सदावर्ते यांनी यासंबंधी राज्यपालांना पत्रदेखील पाठवले होते. कलम २१३ च्या अधिकाराचा वापर करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विचारात घ्यावा, असे त्या पत्रात नमूद केले आहे.

Post a Comment