माय नगर वेब टीम
अहमदनगर - कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात त्यांचे मोठे बंधू डॉ. अशोक विखे यांनी बंड पुकारला आहे. मुळा-प्रवरा वीज वापर संस्थेतील अपहार व विविध संस्थेतील घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी अशोक विखे येत्या २० मे पासून विखे-पाटील कुटुंबाच्या विविध संस्थांच्या चौकशीच्या मागणीसाठी उपोषणाला बसणार होते. मात्र, लोणी पोलिसांनी अशोक विखें यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या पुतळ्यासमोर उपोषण न करता आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने मान्य करून घ्याव्यात व आपल्या उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण शकतो, त्यामुळे आपण उपोषण स्थगित करावे अशी विनंती विखे यांना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. इतकेच नव्हे तर, येत्या २० मे पासून या सर्व मागण्यांसाठी प्रवरानगर मधील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर ते उपोषणाला बसणार होते.

Post a Comment