डीवायएसपिंना धक्काबुक्की करणारे 9 आरोपी जेरबंद



माय नगर वेब टीम

अहमदनगर - सिटी डिवाएसपी संदीप मिटके यांना शिवीगाळ करत, कर्मचार्‍यास धक्काबुकी करणाऱ्या 9 आरोपीच्या मुसक्या तोफखाना पोलीसानी सोमवारी आवळल्या.




सचिन थोरात, किरण नेटके, अक्षर सावळे, प्रकाश कनोजिया, शाहरुख पठाण, ऑगस्टीन जी, आकाश बिडकर, बॉबी साळवे, अर्शद (पूर्ण नाव नाही) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे आहे .

उपनगरातील दीपक पेट्रोल पंप येथे दुचाकीत पेट्रल टाकण्यासाठी ते 1 मे रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास आरटीपीसी गणेश चव्हाण यांच्या सोबत गेले होते. त्यावेळी पंपावर काम करणाऱ्यांनी त्यांची पेट्रोल टाकताना फसवणूक करत, अरेरावी शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. या पप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 11 जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यादिवशी 2 जणांना घटनास्थळवरून तब्यत घेतलं होते तर अन्य 9 जण पसार झाले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post