अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा कार्यकारणी बरखास्त – रामेश्वर निमसे

  


माय नगर वेब टीम  

अहिल्यानगर :- अहिल्यानगर (दक्षिण) जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची दक्षिण जिल्हा कार्यकारिणी तात्काळ बरखास्त करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाव्दरे दिली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके, शहर आणि ग्रामीण भागातील राष्ट्रवादी युवक आघाडीच्या जुन्या कार्यकारिणीतील सर्व पदे याद्वारे रद्द करण्यात आली आहे.

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची युवा फळी अधिक आक्रमक, सक्षम व मजबूत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षसंघटन अधिक मजबूत करणे, पक्षासाठी राबणाऱ्या, निष्ठावंत आणि नव्या दमाच्या तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊन जिल्ह्यात युवक संघटनेचा विस्तार अधिक वेगाने करणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. बरखास्त झालेल्या कार्यकारिणीतील सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आजवर पक्षासाठी दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे यांनी आभार व्यक्त केले आहे.

आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब आणि खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष, व पक्षांचे ज्येष्ठ नेते यांचेशी चर्चा करून लोकांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या युवकांची अहिल्यानगर जिल्ह्यात संघटन अधिक बळकट करण्यात येईल. युवकांच्या प्रश्नांवर आक्रमक लढा उभारणारी नवीन व सक्षम कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल असे रामेश्वर निमसे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post