माय नगर वेब टीम
मुंबई : भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या मैदानावर दोन्ही डावात मोठी धावसंख्या होते. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २५३ धावांचा डोंगर उभारला होता. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी आणि फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी विक्रमी २५४ धावांचा यशस्वी पाठलाग करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना जेकब बेथल आणि विल जॅक्सने पूर्ण जोर लावला. पण भारतीय संघाने हा सामना ७ धावांनी जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २५४ धावा करायच्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला चांगल्या सुरूवातीची गरज होती. पण इंग्लंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. फिल सॉल्ट अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. जोस बटलरने काही आकर्षक फटके मारले. पण तो २५ धावांवर बाद होऊन माघारी परतला. कर्णधार हॅरी ब्रुकही अवघ्या ७ धावांवर बाद झाला. टॉम बँटम १७ धावांवर माघारी परतला. शेवटी जेकब बेथल आणि विल जॅक्सने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून इंग्लंडला विजयाच्या जवळ पोहोचवलं. विल जॅक्स ३५ धावा करून माघारी परतला. पण बेथलने दमदार शतकी खेळी केली आणि इंग्लंडला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं. पण इंग्लंडचा थोडक्यात पराभव झाला.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाला प्रथम फलंदाजीच हवी होती. भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. अभिषेक शर्मा या डावात अवघ्या ९ धावा करून माघारी परतला. त्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशनच्या जोडीने मिळून डाव सांभाळला. दोघांनी मिळून ९६ धावांची भागीदारी केली. यादरम्यान संजू सॅमसनने ८९ धावांची भागीदारी केली. तर इशान किशनने ३९ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर शिवम दुबेने ४३ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव ११ धावांवर माघारी परतला. तर हार्दिक पांड्याने २७ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने २१ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या ७ गडी बाद २५३ धावांवर पोहोचवली.
भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये
भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवून जेतेपदाचा मान पटकावला होता. यावेळी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडविरूद्ध होणार आहे.
प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, तो नसता तर मी इथे उभा नसतो
भारताच्या मोठ्या विजयात संजू सॅमसनने फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले, पण सामना संपल्यानंतर त्याने केलेले विधान चाहत्यांची मने जिंकून गेले. प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाल्यानंतर संजूने तो स्वतःकडे न ठेवता जसप्रीत बुमराहला खरा मानकरी असल्याचे सांगितले.
भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलग दोन पर्वात फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा पाकिस्तान ( २००७ व २००९) आणि श्रीलंका ( २०१२ व २०१४) यांच्यानंतर तिसरा संघ ठरला. पण, पहिल्यांदा गतविजेता संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. भारताच्या ७ बाद २५३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने उपांत्य फेरीच्या या सामन्यात ७ बाद २४६ धावा केल्या. जेकब बेथलच्या १०५ धावांच्या खेळीने भारताला शेवटपर्यंत संघर्ष करायला भाग पाडले. ८९ धावांची खेळी करणारा संजू सॅमसन प्लेअर ऑफ दी मॅच ठरला.
संजू सॅमसन म्हणाला, "खरोखरच खूप छान वाटत आहे. गेल्या सामन्यापासून मी काही प्रमाणात फॉर्ममध्ये आहे, मला तसाच खेळ करायचा होता. खरे सांगायचे तर, मला माहित होते की मी असा खेळ करू शकतो. आपल्या देशासाठी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये फॉर्म मिळवणे सोपे नाही, म्हणून मी मोठा खेळ करण्याचा विचार केला. मी ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा लागेल. म्हणून मी स्वतःला अतिरिक्त वेळ दिला. मला नशीबानेही साथ दिली. वानखेडेवर खेळताना, आम्हाला माहित आहे की येथे कोणताही धाव रोखता येत नाही, म्हणून मी फक्त शक्य तितके धावा काढू इच्छित होतो. येथे २५० धावांचा पाठलाग करण्यासारखे दिसत होते आणि इंग्लंड खरोखरच चांगले खेळले. त्यांच्या फलंदाजांना श्रेय द्यायला हवे.
तो पुढे म्हणाला, मी आधी सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला परिस्थितीचे मूल्यांकन करावे लागेल. आम्ही वानखेडे येथे खूप क्रिकेट खेळलो आहोत, येथे पाठलाग करणे थोडे सोपे होते. आज संघ कसा उभा राहिला याबद्दल खूप आनंदी आहे आणि सर्व श्रेय जसप्रीत बुमराहला जाते. जो या पिढीचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. हा सामनावीर पुरस्कार त्यालाच द्यायला हवा. जर त्याने डेथ ओव्हर्समध्ये अशा प्रकारे गोलंदाजी केली नसती, तर मी येथे उभा नसतो. सर्व श्रेय गोलंदाजांना जाते.
संजू सॅमसनने वानखेडेच्या प्रेक्षकांचेही आभार मानले. तो म्हणाला, लहानपणापासूनच वानखेडेवर खेळणे ही एक अविश्वसनीय भावना आहे. प्रेक्षकांनी आमच्यासह इंग्लंडच्या संघालाही पाठिंबा दिला. ते क्रिकेटचे खरे समर्थक होते. म्हणून मला येथे खेळण्याचा खूप आनंद झाला. आम्हाला त्यांच्यासाठी सकारात्मक निकाल द्यायचा होता.
शतकापेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा...
पुन्हा एकदा शतकापासून वंचित राहिल्याबद्दल संजूला विचारले असता, तो म्हणाला, शतक हुकल्याची खंत मला वाटतं अजिबात नाही. हा कसोटी सामना नाही, हा वन डे सामना नाही जिथे तुम्ही शतकासाठी वेळ घेऊ शकता. एकदा तुम्ही सुरुवात केली की, धावा करणे हाच एक मार्ग असतो. म्हणून मला जे काही मिळत आहे, ते मिळवून मी खूप आनंदी आहे आणि माझ्या देशासाठी विजयात योगदान देण्यास खूप आनंदी आहे.

Post a Comment