भारताने इतिहास रचला! सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपवर कोरलं नाव; किवींचा पराभव करत तिसऱ्यांदा जिंकला विश्वचषक



माय नगर वेब टीम 

नवी दिल्ली - आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात होत आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. भारताने न्युझीलंडसमोर २५६ धावांचे आव्हान दिलं होतं. या आव्हानाचे पाठलाग करताना किवीच्या फलंदाजांना नाकीनऊ आले. भारतीय गोलंदाजांनी किवीच्या फलंदाजांना मोठी खेळी करू दिली नाही. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी शानदार गोलंदाजी केली. बुमराहने ४ विकेट घेतल्या.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने पुन्हा एकदा विजेतेपद मिळवले आहे. भारत जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक तीन टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला देश बनलाय. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने प्रत्येकी दोनदा ट्रॉफी जिंकली आहे.

भारत हा सलग दोन वेळा विजेतेपद जिंकणारा जगातील पहिला देश ठरला आहे. टीम इंडियाने ही कामगिरी केली. इतर कोणत्याही देशाने घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकलेला नाहीये. मात्र सूर्यकुमारच्या सैन्यानेही हे साध्य केले. २००७ आणि २०२४ मध्ये भारताने विजेतेपद जिंकले. २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता आणि २०२४ मध्ये रोहित शर्मा कर्णधार होता. योगायोगाने दोन्ही दिग्गजांनी या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार बनले. दोन्ही दिग्गज टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते.


टी-२० विश्वचषक जिंकणारे देश

भारत - २००७, २०२४, २०२६

इंग्लंड - २०१०, २०२२

वेस्ट इंडिज - २०१२, २०१६

पाकिस्तान - २००९

श्रीलंका - २०१४

ऑस्ट्रेलिया - २०२१

सॅमसन आणि अभिषेकने आक्रमक खेळी

अहमदाबादमध्ये १,००,००० हून अधिक प्रेक्षकांसमोर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी केली. सुरुवातीला खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल होती आणि भारतीय सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी याचा फायदा घेत ७.१ षटकांत ९८ धावांची भागीदारी केली. अभिषेकने स्पर्धेतील त्याचे दुसरे अर्धशतक झळकावले. २१ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह ५२ धावा काढून बाद झाला.

इशान किशन आणि सॅमसनचा धमाका

अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर सॅमसनला इशान किशनने साथ दिली. दोघांनी किवींची धुलाई चालू ठेवली. दुसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत १०५ धावांची भागीदारी केली. पण या ही सामन्यात संजू सॅमसनचं शतक हुकलं. तो ४६ चेंडूत ८९ धावा करून बाद झाला. सॅमसनचे हे सलग तिसरे शतक होते. यापूर्वी, त्याने सुपर ८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ९७ आणि इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ८९ धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडचाच विक्रम केला फस्त –

टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीत सर्वात वेगवान १०० धावा करण्याचा विक्रम आता भारताच्या नावावर नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे, भारताने न्यूझीलंडचाच विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी याच विश्वचषकात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७.५ षटकांत १०० धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत आता भारत पहिल्या, तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे.

सलामीवीरांची ९८ धावांची तडाखेबंद भागीदारी –

भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची तुफानी भागीदारी केली. अभिषेक शर्माने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. हे या विश्वचषकातील कोणत्याही फलंदाजाने केलेले सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. या खेळीमुळे अभिषेकने आपल्या खराब फॉर्मचा शिक्का पुसून काढत सर्वात मोठ्या व्यासपीठावर पुनरागमन केले आहे.

बुमराहचा चौकार

न्यूझीलंडच्या 3 फलंदाजांनाच विजयी धावांचा पाठलाग करताना दुहेरी आकडा गाठता आला. न्यूझीलंडसाठी ओपनर टीम सायफर्ट याने याने अर्धशतकी खेळी करुन न्यूझीलंडला सामन्यात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र डोंगराएवढ्या धावसंख्येसमोर फिनचा हा प्रयत्न प्रयत्नच ठरला. टीमने 26 बॉलमध्ये सर्वाधिक 52 रन्स केल्या. कॅप्टन मिचेल सँटनर याने 43 धावांचं योगदान दिलं. तर डॅरेल मिचेल याने 17 धावा जोडल्या. तर इतरांना भारतीय गोलंदाजांसमोर दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. अक्षर पटेल याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडियाचा 2024 पासून टी 20i वर्ल्ड कपमधील 16 वा विजय

भारताचा हा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 2024 पासूनचा 17 वा सामना होता. भारताने न्यूझीलंडला पराभूत करत 2024 पासून 16 वा विजय मिळवला. तर भारताने एकमेव सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर 8 फेरीत नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गमावला.

भारत टी 20i वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी संघ

टीम इंडियाचा हा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील हा 61 वा सामना होता. टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत 61 सामन्यांमधील 45 वा विजय मिळवला.


अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने गमावलं, तर शिवम दुबेने कमावलं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या संधीचा भारतीय फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 255 धावा केल्या आणि विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं. भारताने या सामन्यात चांगली सुरूवात केली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. त्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशनची जोडी जमली आणि त्यांनी 48 चेंडूत 105 धावा केल्या. अभिषेक शर्मा 21 चेंडूत 52, संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 आणि इशान किशनने 25 चेंडूत 54 धावांची खेळी केली. भारताने 16व्या षटकात 3 गडी गमवून 204 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे उर्वरित चार षटकात आरामात 270 धावांपर्यंत मजल मारली जाईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने 16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विकेट टाकली आणि धावगतीला ब्रेक लागला.

सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण झेल बाद झाला. सूर्यकुमार यादव गोल्डन डकवर बाद झाला. त्यानंतर धावगती मंदावली. भारतीय संघ 240 धावा करेल की नाही अशी शंका वाटू लागली. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा आक्रमक खेळी करण्यात अपयशी झाले. त्यामुळे 17 व्या षटकात 7, 18व्या षटकात 9 आणि 19व्या षटकात 11 धावा आल्या. 19 व्या षटकात हार्दिक पांड्याची विकेट गेल्याने सिवम दुबे मैदानात आला. या षटकात त्याने दोन चेंडूवर 2 धावा घेतल्या. शेवटच्या चेंडूवर 1 धावा घेतल्याने त्याला शेवटच्या षटकात स्ट्राईक मिळाला.

एका षटकात तीन विकेट घेणारा जेम्स नीशम गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शिवम दुबेने चौकार मारला. त्यानंतर सलग 2 षटकार मारले. च्यौथ्या चेंडूवर चौकार मारला. पाचवा चेंडू मारला आणि आरामात एक धाव घेऊ शकला असता. पण शिवम दुबेने स्ट्राईक स्वत:कडे ठेवला आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. या षटकात शिवम दुबेने 24 धावा काढल्या. त्यामुळे भारतीय संघाला 255 धावांपर्यंत मजल मारता आली. सूर्यकुमार यादवच्या विकेटनंतर धावगतीला ब्रेक लागला होता. तो सर्व शेवटच्या षटकात शिवम दुबेने कव्हर केला. त्याने 8 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकार मारत नाबाद 26 धावा केल्या.

तिसऱ्यांदा चॅम्पियन, राज्यात जल्लोष

टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा पराभव केला आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने टी-20 वर्ल्डकपवर तिसऱ्यांदा आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकत क्रिकेटविश्वात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने सर्वांगीण कामगिरी करत न्यूझीलंडवर मात केली. फलंदाजीत भारताकडून अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांनी जबरदस्त खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या तिघांच्या शानदार कामगिरीमुळे भारताला मोठा विजय मिळवता आला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळ दाखवत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यातही भारताने दबदबा कायम ठेवत न्यूझीलंडला नमवले आणि ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात क्रिकेट चाहत्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. भारतीय संघाच्या या यशामुळे देशभरातून खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post