माय नगर वेब टीम
उत्तरप्रदेश : देवदर्शन करून घराकडे जाणाऱ्या ३३ भाविकांच्या पिकअपवर काळाने घाला घातला. उत्तर प्रदेशमधील कौशांबीत पिकअप आणि कंटेनर यांच्यात भीषण धडक झाली, यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत, त्यामधील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. ही धडक इतकी भयंकर होती की पिकअपचा चेंदामेंदा झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकली, या दुर्दैवी घटनेत ८ भाविकांचा मृत्यू झाला. सर्वजण कडा धामचे दर्शन घेऊन येत होते.
अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. पिकअप चेंदामेंदा झाला होता. हायवेवर मृतेदहाच्या रक्ताचा सडाच पडला होता. या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने आणि ८ जणांचे मृतदेह तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. तर या अपघातामधील जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त पिकअपमध्ये ३३ भाविक प्रवास करत होते. सर्वजण फतेहपूर जिल्ह्यातील करौली गावात मुंडन सोहळ्यासाठी पिकअपमधून प्रयागराजला गेले होते. सोहळ्यानंतर घरी परतत येत होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावर पिकअपने कंटेनरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिकांनी आणि इतर प्रवाशांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि बचावकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच सैनी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर जखमींना चांगल्या उपचारांसाठी प्रयागराज येथे हलवण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ५ महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. उर्वरित २५ जण जखमी झाले आहेत. त्यामधील काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

Post a Comment