राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप पदाधिकारी नियोजन बैठक पार
कार्यकर्त्यांकडून युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक आज बुर्हानगर येथे संपन्न झाली.
या बैठकीत भाजपचे संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे यांनी कार्यकर्त्यांना दिशा देत सांगितले की, ही निवडणूक फक्त राजकीय नाही, तर श्रद्धेची आणि वारशाची लढाई आहे.
स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे कार्य, त्यांचा जनसंपर्क आणि जनतेतील नाळ आजही जिवंत आहे.
त्यांना खरी श्रद्धांजली म्हणजे आपला उमेदवार एक लाख मतांच्या फरकाने विजयी करणे!
रवींद्र अनासपुरे पुढे म्हणाले, राहुरी, पाथर्डी आणि नगर तालुक्यांमध्ये आपल्याला मते वाढवायची आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण थोडे मागे राहिलो, पण आता ती चूक पुन्हा होऊ देऊ नका.
प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधावा, मतदार यादींचा सखोल अभ्यास करावा.ते पुढे म्हणाले, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा म्हणजे जनतेच्या हृदयात वसलेली माणुसकी आणि कार्यसंस्कृती.
त्या वारशाचा खरा वारसदार म्हणजे युवा नेते अक्षय कर्डिले आहेत.ते अभ्यासू, कर्तृत्ववान आणि जनतेत स्वीकारार्ह आहेत.
या बैठकीत बोलताना अक्षय कर्डिले यांनी भाषणात म्हटलं की, राहुरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाशी माझे नाते हे केवळ राजकीय नाही, तर कौटुंबिक आहे.
माझे वडील नसताना माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात होईल असं मी कधीच विचार केला नव्हता.पण कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास मला नव्याने बळ देत आहे.
ते पुढे म्हणाले, स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आम्हाला शिकवले की निवडणूक कधीच हलक्यात घेऊ नये.कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि एकजुटीने काम करावे.
गेल्या चार महिन्यांपासून मी जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत आहे. जनतेने वडिलांवर केलेलं प्रेम आज माझ्यावरही करत आहे, हीच आमच्यासाठी खरी ताकद आहे.
अक्षय कर्डिले यांनी सांगितले की, ही निवडणूक आपण संघटितपणे लढवायची आहे, आणि विजय निश्चित आहे.स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या ३० वर्षांच्या कार्याची पावती या निकालातून मिळेल.
बैठकीदरम्यान उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीची मागणी केलीआणि त्यांना विजयी करण्याची ग्वाही दिली.
या बैठकीस संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, अक्षय कर्डिले, जिल्हाध्यक्ष दिलीप बालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहिते, भाऊसाहेब बोठे, काशिनाथ लवांडे, बाजीराव गवारे, बाळासाहेब अकोलकर, संभाजी पालवे, संदीप कर्डिले, अर्जुन पानसंबळ, अण्णासाहेब बाचकर, रंगनाथ गवते, विक्रम भुजाडी, धनंजय आढाव, युवराज गाडे, बाळासाहेब महाडिक, प्रसाद डोकरीकर, श्याम पिंपळे, दादा बोटे, मीराताई बांगर, समीर पठाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुरी विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संघटनेची एकजूट यामुळेही पोटनिवडणूक भाजपसाठी ऐतिहासिक विजयाची संधी ठरणार आहे.
बैठकीतून ठाम संदेश देण्यात आला की, ही लढाई सन्मानाची आहे, आणि हा विजयच स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल.


Post a Comment