यशवंतराव गाडे शिक्षण संस्थेत क्रिडा महोत्सव सुरू
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : खेळात गुरू मिळणे महत्वाचे आहे. शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच खेळालाही प्रतिष्ठा मिळत आहे. खेळासाठी ही सकारात्मक बाब आहे. मुलांनी मोबाईल पेक्षा मैदानावर वेळ घालवला तरच यश तुम्हाला गवसणी घालेल असे मत महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सचिव व राष्ट्रीय कबड्डीपटू सचिन भोसले यांनी केले.
फकिरवाडा ( मुकुंदनगर ) येथील यशवंतराव गाडे विद्यालयात आज वार्षिक क्रिडा महोत्सवाचे भोसले यांच्या हस्ते उदघाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी क्रिडा प्रशिक्षक प्रकाश बालवडकर होते. यावेळी राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.शशिकांत गाडे, क्रिडा प्रशिक्षक शंतनु पांडव , विनायक भुतकर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष एम.पी.कचरे, संचालक ज्ञानदेव पाडुंळे आदि उपस्थीत होते. यावेळी राष्ट्रीय किशोरी गट कबड्डी स्पर्धेत कास्य पदक मिळवणारे खेळाडू समर्थ हेलुडे,ज्ञानेश्वरी ढवण,फौजिया शेख या खेळाडूंचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. नगर मध्ये कबड्डी खेळाची गौरवशाली परंपरा असुन येथील खेळाडूंना उत्तम मार्गदर्शन मिळत असल्यानेच नवोदित खेळाडूंना मोठी संधी असल्याचे मत क्रिडा प्रशिक्षक बालवडकर यांनी व्यक्त केले. शालेय क्रिडा स्पर्धेचे उदघाटन यावेळी करण्यात आले. स्वागत मुख्याध्यापिका संगिता बनकर यांनी तर प्रास्तावीक आदिनाथ लवांडे यांनी केले. योगेश गुंड यांनी सुत्रसंचालन तर मनिषा मगर यांनी आभार मानले .
फोटो : मुकुंदनगर येथील यशवंत गाडे विद्यालयात आज क्रिडा महोत्सवाचे उदघाटन करताना राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सचिन भोसले , प्रा. शशिकांत गाडे, प्रकाश बालवडकर, शंतनु पांडव व विनायक भुतकर उपस्थीत होते.

Post a Comment