बिहारमध्ये ऐतिहासिक विजय: विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही : पालकमंत्री विखे पाटील



माय नगर वेब टीम

 संगमनेर : भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता  विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.


बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.


निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते  त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.


बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम  करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post