सेनापती बापट साहित्य संमेलनाची संयोजन समिती जाहीर : अध्यक्षपदी सचिन चोभे, कार्याध्यक्षपदी सिद्धनाथ मेटे महाराज

 


 नोव्हेंबरमध्ये रंगणार साहित्यमेळा 

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. त्यासाठीचे नियोजन मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यासाठीच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी लेखक सचिन मोहन चोभे यांची, तर कार्याध्यक्षपदी सिद्धनाथ मेटे महाराज आणि समन्वयक पदावर लेखक रामदास कोतकर यांची निवड करण्यात आली आहे.





रविवारी (दि. ५ ऑक्टोबर २०२५) झालेल्या बैठकीत संमेलनाची रूपरेषा ठरवण्यात आली. याबद्दलची माहिती आयोजक संस्था आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, आजच्या तिसऱ्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. काहींनी समक्ष तर अनेकजणांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या बैठकीत हजेरी लावली. सर्व मुद्द्यांवर चर्चा करून त्यानुसार संमेलनात महिला, नवसाहित्यिक, दिव्यांग आणि वंचित घटकांना सहभागी करून घेऊन संमेलन यशस्वी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

रमेश आमले यांनी संयोजन समितीचा ठराव मांडला. त्यास आनंदा साळवे यांनी अनुमोदन दिले. संयोजन समितीच्या सह समन्वयक पदावर कवयित्री स्वाती पाटील यांची निवड करण्यात आली. निमंत्रण समितीमध्ये 

शब्बीरभाई शेख, हेमलता पाटील, रमेश आमले, सुभाष सोनवणे, अमोल इथापे, शेख रज्जाक, ऋतिक लोंढे आदींची निवड करण्यात आली.

तर, व्यवस्थापन समितीमध्ये संदीप गेरंगे, भानुदास कोतकर, वसंत कर्डीले, नामदेव लोंढे, प्रा. शरद दारकुंडे, ॲड. सचिन चंदनशिव, मच्छिंद्रनाथ म्हस्के, प्रा. अमोल सायंबर, अजिंक्य काटकर, मेहेक वाणी, राजेंद्र खुंटाळे, देविदास बुधवंत यांनी सर्व जबाबदारी पार पाडण्याची तयारी दाखवली. संमेलनाचे प्रसिद्धीप्रमूख म्हणून ॲड. राहुल ठाणगे व मकरंद घोडके यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. लवकरच साहित्य संमेलनाची तारीख आणि संमेलनाध्यक्ष निवड करण्यात येईल अशी माहिती गवळी यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post