ज्ञानेश्वरचा यावर्षी ऊस भाव सर्वात जास्त असेल-माजी आ.नरेंद्र घुले पाटील



 ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न....

माय नगर वेब टीम

नेवासा:---  आपला कारखाना आता सर्वदृष्टीने परिपूर्ण झाला असून पुढील काळात कुठलाही भांडवली खर्च नाही. यंदाच्या हंगामात जास्त साखर उताऱ्यासह जास्तीत जास्त ऊस गाळपाचे  उदिष्ट असून यावर्षी 'ज्ञानेश्वर'चा ऊस भाव सर्वात  जास्त असेल अशी ग्वाही लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.


नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक  सर्वसाधारण सभा रविवार दि.२८ सप्टेंबर रोजी दुपारी १:०० वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले  यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

जिल्हा  सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख,आमदार  विठ्ठलराव लंघे पाटील, सौ.रत्नमाला काशिनाथ नवले, सौ.लताताई अशोक मिसाळ, काकासाहेब शिंदे, प्रा.नारायण म्हस्के,भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम, शिवाजी कोलते,मच्छिद्र म्हस्के, विष्णू जगदाळे,दादासाहेब गंडाळ,

कामगार संचालक सुखदेव फुलारी, तुकाराम मिसाळ, बबनराव धस, भैय्यासाहेब देशमुख, दत्तात्रय खाटीक, प्रभाकर कोलते, दत्तात्रय काळे, बाळासाहेब नवले,अजित मुरुकुटे,  

आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी संत ज्ञानेश्वर माऊली व लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

श्री.नरेंद्र घुले पुढे म्हणाले की, नवीन सहकारी संस्था काढणे आता सोपे राहिलेले नाही सहकार संपला की तेथील संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त होते.

सहकारी चळवळ चालवतांना कुठलाही पक्षभेद न ठेवता काम करावे लागते.

१६ लाख ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचा उच्चांक आपण केलेला आहे, गाळप चांगले झाले तर खर्चाची विभागणी होऊन ऊस भाव ही जास्त देता येतो. कारखाना आता परिपूर्ण झालेला असून यापुढे कोणताही भांडवली खर्च नसल्याने या वर्षी  शेतकऱ्यांना सर्वात जास्त भाव दिला जाईल.

आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले, अनंत अडचणीला तोंड देत सहकार पुढे जात आहे. खाजगीशी स्पर्धा करतांना ऊस भावाची स्पर्धा ही क्रमप्राप्त आहेच.  चांगला भाव दिला तर शेतकरी नक्कीच आपल्याला ऊस देतील.

राज्यात आणि तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान घातले असून शेतकरी मेटाकुटिस आलेला आहे. शेतातील सर्वच पिकांसह  फळबागा आणि ऊसाचे ही मोठे नुकसान झालेले आहे. सरसकट पंचनामे  करण्याचे आदेश दिलेले आहेत.  एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे.


माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले की, प्रत्येक हंगामात ऊस गाळपाचे दिवस कमी कमी होत चालले असून ते १०० ते १२०  दिवसावर आलेले असल्याने साखर उतारा चांगला मिळत नाही, कामगार पगार-ऊस तोडणी वाहतूक, देखभाल दुरुस्ती खर्चात वाढ झाली,उसाची एफआरपी  चार वेळा वाढविली मात्र साखरेची एमएसपी आहे तीच आहे. या सर्वांचा ऊस दरावर परिणाम होत असतो.  या गळीत हंगामात १२ ते १३ लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट आहे. भविष्य काळात 

ऊसाचे प्रेसमडवर आधारीत बायोसीएनजी प्रकल्प आणि मका/सोयाबीन यासारखे बहुउद्देशीय कच्चा माल वापरून इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीचा विचार करावा लागणार आहे.

कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादकांनी ज्ञानेश्वर कारखान्यालाच द्यावा असे आवाहन ही श्री. अभंग यांनी केले.

काशीनाथ नवले पाटील,अंकुशराव काळे, दिलीपराव मोटे,  रामदास कोरडे, सुदाम आरगडे यांनी मनोगत व्यक्त केले.

 सभेस नामदेव निकम,अभिषेक पटारे,  विश्वास काळे, शरद आरगडे, वैभव नवले, डॉ.सुदाम खाटीक,भारत साबळे, भारत गुंजाळ,संतोष म्हस्के, ज्ञानदेव पाडळे, राजेंद्र परसय्या, बबन भानगुडे, एकनाथ भुजबळ, पंढरीनाथ फुलारी, अजझर शेख, बाळासाहेब धोंडे,किशोर मिसाळ,केदारनाथ आगळे, चंद्रकांत फुलारी, निवृत्ती ढोकणे, तुकाराम शिंगटे, काकासाहेब घुले, रवींद्र नवले, मालोजी भुसारी, संभाजी पवार, सुनील हापसे, गुलाब आढागळे, शेषराव दुकळे, हरिभाऊ दुकळे, रवींद्र कुलकर्णी, काकासाहेब बोरुडे, रावसाहेब गडेकर, बलभीम फुलारी, कचरदास गुंदेचा,दत्तात्रय माळवदे, किसन यादव, बन्सी मुंगसे आदी यावेळी उपस्थित होते.

कारखान्याचे जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. 

कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी सभा नोटीसीचे वाचन केले. 

सरव्यवस्थापक रवींद्र मोटे यांनी अहवाल सालातील दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करणारा ठराव मांडला व मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन केले.

मुख्य लेखपाल रामनाथ गरड यांनी नफा-तोटा पत्रके, ताळेबंदाचे वाचन केले.

अशोकराव मिसाळ यांनी आभार मानले.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post